अकोल्यातील सुप्रसिद्ध सामर्थ्य फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन 3 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. सामर्थ्य फाउंडेशन ची वेबसाईट बनवण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली होती.
सामर्थ फाउंडेशनच्या प्रचंड उपक्रमांना वेबसाईटच्या माध्यमातून, व्यवस्थित संकलन करून, वेबसाईटवर टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे.
त्यामध्ये सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रबोधजी देशपांडे आणि कार्यकारी मंडळातील सन्माननीय सदस्यांचे मार्गदर्शन लाभले.
या वेबसाईटचे उद्घाटन आदरणीय सत्यपाल महाराज यांच्या हस्ते वर्धापन दिनाच्या निमित्ताने करण्यात आले.
सामर्थ्य फाउंडेशनच्या निस्वार्थ आणि निस्पृह कार्यांची ओळख करून घेण्यासाठी या वेबसाईटला अवश्य भेट द्या.



